Audit Branch

Dr. Kedaree Jadhav

Director Administration

Shri. Balasaheb Badakh

Jt. Registrar (Audit)

Work Procedure of Audit Branch

  1. राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या लेखापरीक्षणाबाबत अद्यावत नोंदी ठेवणे. त्याबाबतची नोंदवही अद्ययावत राखणे.
  2. विहीत मुदतीत लेखापरीक्षण पूर्ण झाले अथवा नाही, निर्धारित कालावधीमध्ये लेखापरीक्षण अहवाल संबंधितास प्राप्त झाला अथवा नाही, या बाबींवर देखरेख ठेवणे.
  3. राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे लेखापरीक्षण पूर्ण होणेस अनुसरून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे. तदनुषंगाने 100 % लेखापरीक्षण पूर्णत्वासाठी उपाययोजना करणे.
  4. लेखापरीक्षण अहवालातील आर्थिक निकषांची माहिती नियमित प्रपत्रांमध्ये जतन करणे.
  5. लेखापरीक्षणाअंती सादर झालेले प्रशासकीय कारवाईसाठीचे विशेष अहवाल व फौजदारी कारवाईसाठीचे विनिर्दिष्ट अहवालावर वेळचे वेळी कार्यवाही होणेसाठी देखरेख व पाठपुरावा करणे.
  6. सहकारी साखर कारखान्यांचे परिव्यय व कार्य लेखापरीक्षण पूर्णत्वाबाबत नोंदवही ठेवणे. परिव्यय व कार्य लेखापरीक्षा करून घेणेबाबत पाठपुरावा करणे.
  7. सहकारी साखर कारखान्यांचे उर्जा लेखापरीक्षण (एनर्जी ऑडिट) पूर्णत्वाबाबत नोंदवही ठेवणे. एनर्जी ऑडिट करून घेणेबाबत पाठपुरावा करणे.
  8. अर्हताधारक कॉस्ट अकौंटंट व एनर्जी ऑडिटर यांची नामतालिका तयार करून ती अद्ययावत राखणे.
  9. लेखापरीक्षण शुल्क आकारणी, वसुली व थकबाकी इ. बाबतच्या नोंदवह्या अद्यावत ठेवणे. लेखापरीक्षण शुल्क वसुलीस अनुसरून पाठपुरावा करणे.
  10. साखर आयुक्तालयाकडील कार्यरत विविध शाखांकडून अभिप्रायासाठी आलेल्या धारिकांवर आर्थिक निकषास अनुसरून अभिप्राय देणे.

This website belongs to Sugar Commissionerate, Maharashtra Division.

Copyright © This is the official website of Sugar Commissionerate, Maharashtra. All rights reserved.