सन 1970 मध्ये सहकार चळवळीच्या पुनर्रचने संदर्भात श्वेतपत्रिका काढण्यात आली. त्यास अनुसरुन राज्यस्तरीय लेखासमिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर स्वतंत्र साखर संचालनालय, पणन संचालनालय आणि वस्त्रोद्योग संचालनालय अस्तित्वात आले.
सन 1971 मध्ये सहकार विभागांतर्गत पुणे येथे साखर संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. 1991-92 मध्ये साखर संचालनालयाचा दर्जा वृध्दिंगत करून साखर आयुक्तालय सुरू करण्यात आले.
सन 2000 पर्यंत साखर आयुक्तालयाचे कार्यालय पीएमटी बिल्डिंग, शंकरशेट रोड, स्वारगेट, पुणे येथे कार्यरत होते. त्यानंतर नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर, पुणे येथे कृषी महाविद्यालयाच्या 7.5 एकर जागेत ऊस पुरवठादार शेतक-यांच्या आर्थीक मदतीतुन सुंदर, देखणी अशी साखर आयुक्तालयाची सुसज्ज वास्तू तयार झाली. या नूतन वास्तूचे (“साखर संकुल”) उद्घाटन दि.01-01-2001 रोजी झाले.
साखर क्षेत्राचा महत्त्वपूर्ण घटक असणारे साखर आयुक्तालय, राज्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.
महाराष्ट्रात साधारणतः 40 लाख शेतकरी उसाचे पीक घेतात. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या वार्षिक उलाढाल साधारणतः एक लाख कोटीपेक्षा जास्त रकमेची आहे. राज्यातील उसाचे क्षेत्र 14.87 लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे. राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात साखर उद्योगाचे मोठे योगदान आहे. देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राचा एक तृतीयांश इतका वाटा आहे . ग्रामीण भागात साखर उद्योगामुळे शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, ग्राहक संस्था, उपसा जलसिंचन योजना, कृषी सेवा केंद्र, यांचे जाळे तयार झाले आहे. साखर उद्योगामुळे आसवन्या, इथेनॉल, सहवीज निर्मिती, पार्टिकल बोर्ड, खते, ठिबक सिंचन, ऑक्सिजन निर्मिती, ग्रीन हायड्रोजन निर्मिती, इतर रसायने उत्पादने व कृषीवर आधारित उद्योगांची निर्मिती झाली आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तीस लाख इतकी साधारणतः आहे. सर्व साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची संख्या दोन लाखाच्या आसपास आहे. सन 2023-24 हंगामात सहकारी तत्त्वावरील 104 व खाजगी तत्त्वावरील 104 असे एकूण 208 साखर कारखाने चालू होते. या कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता 9,51,150 (TCD) इतकी आहे. या कारखान्यांनी हंगामामध्ये 1076.18 लाख मे.ट. इतक्या उसाचे गाळप केले आहे व 10.27% साखर उता-याने 1101.7 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)
उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)
उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)
सहकार मंत्री (महाराष्ट्र राज्य)
सहकार राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)
प्रधान सचिव, सहकार, पणन व वस्रोद्योग
आयुक्त, साखर
ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे
कॉपीराइट © साखर आयुक्तालय, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.