प्रादेशिक सहसंचालकांची भूमिका

  1. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व कारखान्यांमध्ये उत्पादित होणा-या साखरेचे प्रमाण तसेच सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांमध्ये रोज गाळप होणा-या ऊसाचे प्रमाण याबाबत येणारी माहिती एकत्र करण्याचे काम प्रादेशिक कार्यालये करतात.
  2. संकलित गाळप अहवाल गाळप हंगाम दरम्यान प्रत्येक प्रादेशिक कार्यालयामार्फत रोजच्या रोज ई-मेलद्वारे आयुक्तालयाच्या विकास शाखेला पाठविला जातो.
  3. प्रादेशिक कार्यालये आपापल्या क्षेत्रातील थकीत ऊस दराचे पाक्षिक अहवाल तयार करतात आणि ते साखर आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाला पाठवितात.
  4. साखर कारखान्यांचे विविध प्रस्ताव स्वीकारणे, त्यांची छाननी करणे आणि ते आयुक्तालयाकडे पाठविणे अथवा त्याबाबत शिफारस करणे.
  5. विभागातील सहकारी साखर कारखान्यांचे निबंधक (साखर आयुक्तालयाव्दारे प्रदत्त अधिकार) म्हणून कामकाज करणे.
  6. सहकारी साखर कारखान्यांची तपासणी
  7. नाबार्ड, आयुक्तालय आणि मंत्री समितीच्या बैठकांसाठी माहिती संकलित करणे.
  8. कार्यक्षेत्रातील सहकारी साखर कारखान्यांचे लेखापरीक्षण करणे.
  9. क्षेत्रीय पातळीवर आयुक्तालयाला सहाय्य करणे.
  10. साखर कारखान्यांना महसूल विभागणी सूत्राप्रमाणे (Revenue Sharing Formula) प्रमाणे अनुज्ञेय असणारे दर ठरविण्याकरीता तक्ता क्र. 1 ते 9 मध्ये नमूद माहितीचे ऑनलाईन संकलन, तपासणी, त्रुटींची पूर्तता करून ऊस नियंत्रण मंडळाचे मान्यतेने निर्धारीत दर अदा करणेबाबतची कार्यवाही करणे.
  11. क्षेत्रीय स्तरावरील व साखर आयुक्तालय / राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये कामकाज पाहणे.
  12. साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम समाप्तीनंतर तोडणी व वाहतूक खर्च अंतिम करणे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट मांजरी, पुणे यांचेकडून Dirversion Certificate घेऊन साखर उतारा अंतिम करणेबाबतची कार्यवाही करणे.

ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे

कॉपीराइट © साखर आयुक्तालय, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.