सहकारी / खाजगी साखर कारखाना / खांडसरी यांना गाळप परवाना देणे.
ऊस नियोजनाबाबत ऊस उपलब्धतेविषयी माहिती संकलन / गाळपासंबंधी अहवाल सादर करणे.
कारखान्यांचे गाळप क्षमता विस्ताराचे प्रस्ताव छाननी करून शासनास सादर करणे.
ऊस लागवड अनुदान अर्थसहाय्य / ऊस विकास निधी / साखर विकास निधी अंतर्गत कारखान्याचे प्रस्तावाबाबत कामकाज करणे, विनियोग व सनियंत्रण करणे.
केंद्र व राज्य कृषी मूल्य आयोगाशी संबंधित कामकाज करणे.
ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रस्ताव विषयक कामकाज करणे.
ऊस विकास संबंधीच्या सभा, संमेलने, कॉन्फ़रन्स इ. माहिती संकलन करणे.
वसंतदादा शुगर इन्सस्टिटयूट, ऊस संशोधन केंद्र (पाडेगाव), कृषी खाते (प्र. व भं. योजना) यांचेशी समन्वय साधणे व शुगरकेन अडॉप्टीव्ह रिसर्च प्रोजेक्टबाबत कामकाज करणे.
अर्नेस्टमनी डिपॉझिट लायसन्य फी, नोंदणी फी, गॅरंटी फी, इ. स्विकारणे व त्याबाबतची पुढील कार्यवाही करणे.
गाळपा अभावी उभ्या असलेल्या ऊसास अनुदानाबाबत कामकाज करणे.
अतिरिक्त ऊसाचे गाळप होण्याकरीता उपलब्ध ऊसाचे वेळेमध्ये गाळप होण्याकरीता ऊसक्षेत्राचे वाटप करून विहीत मुदतीमध्ये संपूर्ण ऊसाचे गाळप हंगाम संपण्यापूर्वी गाळप पूर्ण करणे.
ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे